बॉयफ्रेन्डसोबत ‘ब्रेकअप’ झाल्याबद्दल बोलली ॲक्ट्रेस सना खान, म्हणाली – ‘त्यानं मला धोका दिला, विषारी बनलं होतं नातं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ॲक्ट्रेस सना खान सध्या आपल्या खासगी आयुष्याला घेऊन चर्चेत आहे. तिनं तिचा बॉयफ्रेंड मेल्विन लुईसवर धोकेबाजीचा आरोप केला आहे. सोशलवर तिनं लांबलचक पोस्ट लिहली आहे. तिनं सांगितलं आहे की, ती बॉयफ्रेंडपासून का वेगळी झाली आहे.

https://www.instagram.com/p/B8dL_GXg-tB/

सना खान म्हणते, “ही माझी पहिलीच वेळ आहे. मला खरं बोलण्यासाठी खूप हिंमत लागली आहे. असे अनेक लोक आहेत जे प्रेमावर नात्यावर विश्वास ठेवतात. प्रेम आणि सन्मान देतात. परंतु दुर्दैवानं मला ते नाही मिळालं जे मला मिळायला हवं होतं.”

https://www.instagram.com/p/B8YIIf2ACoO/

सना म्हणते, “हा माणूस खूप घाणेरडा आहे. मला त्याला ओळखायला एक वर्ष लागलं. माझा त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास होता. मी माझ्यासाठी स्टँड घेतला. तो एक धोकेबाज आहे, खोटारडा आहे. फेम आणि पॉप्युलॅरिटीसाठी कोणासोबतही असं करू शकतो, त्याच्यासाठी ही कॉमन गोष्ट आहे.”

https://www.instagram.com/p/B7-frpggg9i/

सना सांगते, “त्यानं खूप मुलींसोबत मिळून मला चीट केलं आहे. परंतु मला त्यातील एका मुलीचं नाव माहिती आहेत, जिचं नाव ऐकून मी हैराण झाले. #shameonyou miss…मी जगाला तुझं नाव सांगणार आहे, म्हणजे लोकांना तुझ्याबद्दल समजेल.”

https://www.instagram.com/p/B8DjiFnAFiL/

सना म्हणाली होती की, “मी आजारी होते. परंतु त्याला काही काळजी नाही. मी खूप खुश आहे की, देवानं मला या विषारी रिलेशनशिपपासून वाचवलं. मला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. परंतु आता माझा कोणावरच विश्वास राहिलेला नाही.

https://www.instagram.com/p/B7kSUNjA0Zn/

https://www.instagram.com/p/B5fYdOKg44W/

https://www.instagram.com/p/B3WI6Qkgav1/