अभिनेत्री सना खान आणि Ex बॉयफ्रेंड मेल्विन लुईस यांच्यामध्ये ‘सोशल’ वॉर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सना खान सध्या आपल्या कामामुळे नाही तर आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत येताना दिसत आहे. सना आणि तिचा बॉयफ्रेंड मेल्विन लुईस यांचं ब्रेअकप झालं आहे. वेगळं झाल्यानंतर आता दोघंही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. नुकतीच सनानं एक्स बॉयफ्रेंड मेल्विनला प्रत्युत्तर देत एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सनाची ही पोस्ट सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B8dwOv7Ft_G/?utm_source=ig_embed

मेल्विन आपल्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. यात त्याच्या टीशर्टवर लिहिलं होतं की, बुलाती है मगर जाने का नही. यानंतर सनानं ही पोस्ट शेअर करत मेल्विनला उत्तर दिलं आहे. आपल्या इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये सना म्हणते, “जी मुलं स्टेटस टाकत आहे की बुलाती है मगर जाने का नहीं त्यांना मला सांगायचं आहे की, सत्य हे आहे की, जाने का है मगर बलाती नहीं.”

https://www.instagram.com/p/B8iTO7TgfcR/?utm_source=ig_embed

सना खाननं नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मेल्विन लुईसनं तिला धोका देत तिची फसवणू केली आहे. याशिवाय सनानं एक व्हिडिओ शेअर केला होता. यात सनानं सांगितलं होतं की, मेल्विन एकाच नाही तर अनेक मुलींना डेट करत होता. सनानं असंही सांगितलं होतं की, ब्रेकअपमुळे तिला एंग्जायटी आणि डिप्रेशनशी लढावं लागलं आहे.

https://www.instagram.com/p/B8A9-5aAPlp/?utm_source=ig_embed

सनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिनं बॉलिवूडमधील अनेक सिनेमात काम केलं आहे. याशिवा ती बिग बॉसमध्ये देखील दिसली आहे. बिग बॉसमधून सनानं खूपच अटेंशन घेतलं होतं.

https://www.instagram.com/p/B8dL_GXg-tB/