सना खाननं केली मुफ्ती अनस सोबत विवाहाची घोषणा, पतीसोबत शेयर केला पहिला फोटो

नवी दिल्ली : सना खानने मौलाना मुफ्ती अनस खानसोबत निकाह केल्याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. तिने अनससोबतचे आपल्या विवाहाचे फोटो शेयर केले आहेत. नुकताच दोघांच्या विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने वायरल झाला होता. सना आणि अनसने 20 नोव्हेंबरला विवाह केला होता.

सनाने इंस्टाग्रामवर आपल्या पतीसोबतचे फोटो शेयर केले आहेत. फोटोत अनसने सफेद शेरवानी परिधान केल्याचे दिसत आहे. तर सना खान वधुच्या लाल रंगाच्या कपड्यात सजलेली दिसत आहे. तिने पोस्ट शेयर करत लिहिले आहे की, अल्लाहसाठी एकमेकांशी प्रेम केले, अल्लाहसाठी विवाह केला, या जगात अल्लाहने आम्हाला सोबत ठेवावे आणि जन्नतमध्ये पुन्हा भेट करावी.

यासोबतच सना खानने आपले नाव बदलून डरूळशव डरपर घहरप केले आहे. तिच्या पतीचे खरे नाव अपरी डरूळशव आहे. सनाचा पती अनस एक मौलाना आहे आणि गुजरातच्या सूरतमधील राहणारा आहे. काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल झाला होता, ज्यामध्ये सना आणि तिचा पती हातात हात घालून जिन्यावरून उतरताना दिसत होते. तर दुसर्‍या व्हिडिओत ते केक कापताना दिसत आहेत.

सना खानने व्हाईट वेडिंग ड्रेस घातला आहे, तर मुफ्ती अनसने सुद्धा व्हाइट रंगाचा शेरवानी परिधाम केला आहे. फॅन्स मुफ्ती अनस खान आणि सना खानला शुभेच्छा देत आहेत. सोबतच अनेक लोक या अचानक झालेल्या विवाहामुळे हैराण सुद्धा आहेत.

फॅन्सना हे जाणून घ्यायचे आहे की, अखेर मुफ्ती अनस आणि सना खान कुठे भेटले? स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, सना खान आणि मुफ्ती अनस खान यांची भेट बिग बॉस फेम एजाज खानने करून दिली होती.

मागील काही दिवसांपूर्वी बॉलीवुड सोडण्याची घोषणा करताना सना खानने एक मोठी पोस्ट लिहिली होती. तिने लिहिले होते की, मी माझ्या धर्मात शोध घेतला तेव्हा समजले की, जगातील हे जीवन प्रत्यक्षात मरणाच्या नंतरचे जीवन चांगले बनवण्यासाठी आहे, आणि ते याच स्थितीत चांगले असू शकते, जेव्हा व्यक्ती आपल्याला निर्माण करणार्‍याच्या सूचनेनुसार जीवन व्यतीत करेल आणि केवळ संपत्ती, ऐश्वर्य यास आपले ध्येय बनवू नये.

You might also like