सना खानला एका सिनेमासाठी मिळायचं ‘एवढं’ मानधन, आकडा ऐकून व्हाल थक्क

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सना खानने बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. अल्लाह माझ्या या नव्या प्रवासात मला मदत करेल. मी अल्लाहच्या आदेशांचे पालन करेन, असे सना खानने पोस्ट शेअर केली आहे. तसेच सनाने बॉलिवूडपासून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले आहे. चित्रपटात काम करून सना खान एका वर्षात सुमारे 11 कोटी रुपये कमवत होती.

अभिनेत्री सना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली. 2005 मध्ये ’यही है हाय सोसायटी’ या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकीर्द सुरू केली आहे. यानंतर हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड अशा भाषेतील अनेक सिनेमे तिने केलेत. बिग बॉस आणि फिअर फॅक्टर या रिअ‍ॅलिटी शोमध्येसुद्धा ती झळकली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री सना खानने जेव्हा इंडस्ट्री सोडली तेव्हा ती यशस्वी अभिनेत्री बनली होती. सना खानला एका सिनेमासाठी उत्तम मानधन मिळायचे. तिच्या संपत्तीबाबत कुठेही अधिकृत आकडेवारी दिलेली नाही.

वर्षाच्या सुरुवातीला सनाचे बॉयफ्रेंड मेलविन लुईससोबत ब्रेकअप झाले होते. यावेळी तिने मेलविन लुईसवर अनेक आरोप केले. त्याच्याबद्दल तिने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या. आता या सर्व जुन्या पोस्ट तिने तिच्या अकाउंटवरून डिलीट केल्या आहेत. आता पुन्हा एकदा अभियन क्षेत्र सोडण्याच्या निर्णयामुळे चर्चेत आली आहे.

20 नोव्हेंबरला सना खानने मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी ’निकाह’ केलाय. सूरतमध्ये हा निकाह पार पडला असून, यानंतर लगेच या ‘निकाह’चे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पाठोपाठ खुद्द सना खानने ’निकाह’नंतरचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. आता सना खानने तिचे नावही बदलले आहे. इन्स्टाग्रामवर तिने सय्यद सना खान असे नवे नाव टाकले आहे.

एकमेकांवर प्रेम केले अल्लाहसाठी… एकमेकांसोबत ’निकाह’ केला अल्लाहसाठी… अल्लाहने आम्हाला या जगात एकत्र ठेवावे. स्वर्गातही ही सोबत अशीच राहावी…, असे लिहित सनाने ’निकाह’चे वृत्त चाहत्यांसोबत शेअर केलंय.