Video : अभिनेत्री सना खाननं केलं गुपचूप लग्न ! महिनाभरापूर्वीच सोडली होती फिल्म इंडस्ट्री

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस स्पर्धक सना खान (Sana Khan) हिनं तिच्या चाहत्यांना इंडस्ट्री सोडत झटका दिला होता. तिनं घोषणा केली होती की, मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी ग्लॅमरची दुनिया सोडत आहे. आता अशी माहिती आहे की, सना खाननं लग्न केलं आहे.

सना खाननं सुरत, गुजरातमध्ये मुफ्ती अनस नावाच्या व्यक्तीसोबत गेल्या रात्री लग्न केलं आहे. सना खान आणि मुफ्ती अनस यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या कपलनं एका प्रायव्हेट सेरेमनीत आणि आई-वडिलांच्या उपस्थितीत लग्न केलं आहे.

समोर आलेल्या व्हिडिओ सना आणि तिचा पती व्हाईट आउटफिटमध्ये दिसत आहेत. आधी ते पायऱ्या उतरत आहेत आणि केक कापताना दिसत आहे. कपल यावेळी खूपच खूश दिसून आलं. तिनं मुफ्ती अनसला केकही भरवला आहे. व्हाईट आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

सनानं 9 ऑक्टोबर रोजी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सागितलं होतं. सोशलवर हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेत तिनं चाहत्यांसाठी एक नोट लिहिली होती. यात तिनं सांगितलं होतं की, एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीला गुड बाय करत आहे.

सनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर 2014 मध्ये आलेल्या सलमान खानच्या जय हो सिनेमात तिनं काम केलं आहे. याशिवाय ती बिग बॉस 6 मध्येदेखील दिसली आहे. एक टीव्ही अ‍ॅक्ट्रेस म्हणूनही ती खूप फेमस होती.

 

You might also like