सना खानचा Ex बॉयफ्रेंड मेल्विनवर ‘खळबळजनक’ आरोप, म्हणाली – ’18 वर्षांच्या मुलीला प्रेग्नंट केलं होतं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आणि बिग बॉसची माजी स्पर्धक सना खान आणि एक्स बॉयफ्रेंड कोरियोग्राफर मेल्विन लुईसच्या ब्रेकअपच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होताना दिसत आहे. सनानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, मेल्विननं तिला धोका दिल आहे. तिनं ब्रेकअपची घोषणाही केली होती. यानंतर आता दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. यानंतर सना अनेक खुलासे करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B7-frpggg9i/?utm_source=ig_embed

सना खाननं एका वेबासाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “त्यानं मला धोका दिला आहे. मी त्याच्या फोनवर मेसेज पाहिले आहेत. मी त्याच्यासोबत बोलायला गेले होते तेव्हा तो मुलींशी बोलत होता. मी जेव्हा परदेशातून आले तेव्हा अचानक त्याच्या घरी गेले. मला एक दिवस आधीच कळालं होतं की, त्याच्या आयुष्यात खूप साऱ्या मुली आहेत.”

https://www.instagram.com/p/B8neKhlg34V/?utm_source=ig_embed

’20 दिवस घेतली झोपेची औषधं’

सना खान म्हणाली, “ब्रेकअपनंतर मी डिप्रेशनमध्ये गेले होते. माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. गेल्या 20 दिवसांपासून मी झोपेची औषधं घेतं आहे. गेल्या दोन दिवसांपासून मला औषधांशिवाय झोप येत आहे. मी खुश आहे लोक मला सांगत आहेत की मला मुव ऑन करायल पाहिजे. जे लोक प्रामाणिक असतात त्यांना पुढे जायला वेळ लागतो.”

https://www.instagram.com/tv/B8tBR4oApX_/?utm_source=ig_embed

18 वर्षाच्या मुलीला केलं प्रेग्नंट

सनानं सांगितलं की, “माझ्या मित्रांनी त्याला मुलींसोबत वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलं आहे. त्यानं घरच्यांची शपथ खाल्ली की, तो मला धोका देत नाहीये. पुढच्या 10 मिनिटांत मी त्याला पकडलं. मग मी त्याच्या आईला कॉल करून सांगितलं तुमचा मुलगा मला फसवत आहे. मी ब्रेकअप करत आहे.” सनानं असंही सांगितलं की, मेल्विननं 18 वर्षांच्या मुलीला प्रेग्नंट केलं आहे.

https://www.instagram.com/p/B8lTy-dguEy/

https://www.instagram.com/p/B8YIIf2ACoO/