पोलीसनामा ऑनलाइन – एक्स टीव्ही अॅक्ट्रेस आणि बिग बॉस स्पर्धक सना खान (Sana Khan) हिनं तिच्या चाहत्यांना इंडस्ट्री सोडत झटका दिला होता, तिनं घोषणा केली होती की, मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाह च्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी ग्लॅमरची दुनिया सोडत आहे. यानंतर सना खाननं 20 नोव्हेंबर रोजी अचानक सुरत, गुजरातमध्ये मुफ्ती अनस (Mufti Anas) नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. सना खान आणि मुफ्ती अनस यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर सतत काही ना काही कारणानं सना चर्चेत येताना दिसत आहे. तिचे फोटो किंवा व्हिडीओ सतत अटेंशन घेताना दिसत आहेत. आता एका मुलाखतीत बोलताना सनानं सांगितलं आहे की, त्यांची पहिली भेट कुठं झाली होती. आई बनण्यावरही ती बोलली आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सनानं सांगितलं की, मुफ्ती सोबत तिची पहिली भेट 2017 साली मक्का येथे झाली होती. ज्या दिवशी सना भारतात आली त्या दिवशीच दोघांची छोटीशी भेट झाली होती. ते इस्लामिक स्कॉलर आहे. मला धर्माशी संबंधित काही प्रश्न विचारायचे होते म्हणून मी 2018 च्या अखेरमध्ये त्यांच्याशी संपर्क साधला. यानंतर 2020 मध्ये आमचा पुन्हा संपर्क झाला.
रात्रीतुन नव्हता घेतला अनससोबत लग्नाचा निर्णय
सनानं सांगितलं की, तिनं अनस सोबत लग्नाचा निर्णय हा रात्रीतून नव्हता घेतला. आयुष्यात असा माणूस मिळवण्याासाठी मी अनेक वर्ष प्रार्थना केली आहे. त्याच्यातली कोणती गोष्ट मला आवडत असेल तर ती आहे त्याच्या सभ्यपणा. तो जजमेंटल नाहीये.
फॅमिली प्लॅनिंग बद्दल सना म्हणते…
सनाला जेव्हा फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारण्यात आलं तेव्ह सना म्हणाली, माझ्या पतीची इच्छा आहे की, मी वेळ घ्यावा परंतु मला लवकरच आई व्हायचं आहे.