कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जनास सनातनचा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल आहे. त्याच्या अंतर्गतच नद्यांचे प्रदूषण होऊ नये याकरिता गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचा साठी पुढाकार घेतला जात आहे. मात्र पुण्यात सनातन संस्थेने कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जन करण्यास विरोध केला आहे.

पुण्यात महापालिकेतर्फे विविध ठिकाणी गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. याठिकाणी विसर्जन करण्यास सनातन संस्थेने विरोध केला आहे.

का आहे सनातनचा विरोध

सनातनने नागरिकांना कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन केले आहे. हिंदू धर्म शास्त्रानुसार वाहत्या पाण्यामध्येच गणेश मूर्तींचे विसर्जन झाले पाहिजे. त्यामुळे नागरिकांनी मूठा नदी पात्रातच गणेश मूर्तींचे विसर्जित कराव्यात असे सनातनने म्हटले आहे.

कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सनातन संस्थेचे नाव नेहमीच वेगवेगळया वादात अडकले आहे. अलीकडेच महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा येथे छापा मारुन बॉम्ब बनवण्याचे साहित्य, शस्त्रसाठी जप्त केला होता. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचे नाव सनातनशी जोडण्यात आले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’66fcea4e-bbf6-11e8-b4a8-df2ef55fed4a’]