बॉम्ब तयार करून सनातनकडून मेक इन इंडियाचे पालन : भुजबळ

नाशिक : पोलीसनामा

सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिला होता. त्याचेच जणू पालन करत हे लोक घरातच बॉम्ब तयार करू लागले आहेत. त्यामुळे सनातन सारख्या संस्थेवर बंदी आणावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे आयोजित संविधान बचाव देश बचाव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, फौजिया खान, अरुण गुजराती, विद्या चव्हाण आदी नेते उपस्थित होते.

[amazon_link asins=’B00KGZZ824,B01DEWVZ2C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’57b7d53e-a75e-11e8-a022-a5ab2ef0986e’]

भुजबळ म्हणाले, आपला देश हा संविधानाने संपूर्ण भारत देश एकसंध बांधला गेला आहे. सध्याच्या सरकारकडून घटना पायदळी तुडविण्याचे काम सुरू आहे. यामुळे घटना वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. मनुस्मृतीमुळे हजारो वर्ष दलित आणि महिलांवर अत्याचार होत होते. त्यासाठी महात्मा फुले यांनी त्या काळात आवाज उठविला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरू मानून मनुस्मृती नष्ट करून संविधानाची निर्मिती केली. संविधानात व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, संविधानातील ही तत्वे सध्याच्या व्यवस्थेकडून मोडीत काढली जात आहेत. देश मागास राहण्यात मनूची वृत्ती कारणीभूत आहे. ही वृत्ती परत रुजविण्याचे काम सध्या केले जात आहे.

या अगोदर देशात विरोधी पक्षांचा सन्मान राखला जात होता. मात्र, सध्याच्या सरकारकडून विरोधी पक्षांचा सन्मान न करता आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे मनुस्मृती जाळली म्हणून महिलांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, संविधान जाळले म्हणून कुणावरही गुन्हा दाखल होत नाही, ही खेदाची बाब आहे. या कार्यक्रमानंतर उपस्थितांनी मनुस्मृती आणि ईव्हीएम मशीनच्या प्रतिकांची होळी करण्यात आली.
Loading...
You might also like