‘महसूल’च्या ताब्यातून वाळूचा डंपर पळविला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  – नगर-मनमाड रस्त्यावरील विळद घाट येथे वाळूची चोरी करताना महसूलच्या पथकाने डंपर पकडला होता. तो डंपर मध्यरात्रीच्या सुमारास पळून नेण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मंडळाधिकारी वृषाली करोसिया व इतर महसूल कर्मचाऱ्यांचे पथक बेकायदा गौण खनिजाची वाहतूक रोखण्यासाठी नगर-मनमाड महामार्गावर गस्त घालत होते. विळद घाट येथे गौण खनिजाची वाहतूक करणारा डम्पर महसूल पथकाने पकडला. डम्पर चालकाकडे वाहतूक परवाना नसल्याने डम्पर तहसील कार्यालयात घेण्यास चालकांना सांगण्यात आले होते. हा डम्पर नगरकडे आणत असताना एका चारचाकी गाडीतून दोघे आले. त्यांनी मंडळाधिकारी व इतर कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांच्या ताब्यातून डम्पर पळवून नेला.

या डम्परचा महसूल पथकाने आपल्या गाडीतून पाठलाग सुरू केला. त्या वेळी दोघांनी पथकाच्या गाडीला एक गाडी आडवी लावून डम्पर पळवून नेण्यात मदत केली. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री मंडळाधिकारी वृषाली करोसिया यांच्या फिर्यादीवरून किशोर वादळे व लाल शर्ट घातलेल्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/