केडगाव परिसरात वाळू माफिया सक्रिय

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन
दौंड तालुका हा जर सर्वात जास्त बदनाम कुणामुळे झाला असेल तर तो रक्तरंजित वाळू संघर्षामुळे झाला आहे असे तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक आजही आवर्जून सांगताना पाहायला मिळते. तालुक्यात रक्तरंजित वाळूसंघर्षातून झालेले खून आणि जबरी मारामाऱ्या यामुळे यावर जणू शिक्का मोर्तबच झाले आहे.
प्रशासनाला हुलकावणी देण्यासाठी काहीकाळ हे वाळू माफिया शांत बसल्यानंतर आता पुन्हा एकदा ते सर्व ताकदीनिशी केडगाव परिसरात सक्रिय झाले असून आता या रक्तरंजित वाळूचा संघर्ष केडगाव परिसरात पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूमाफिया सक्रिय होऊन त्यांच्याकडून यंत्रांच्या सहाय्याने अमाप वाळू उपसा सुरू झालेला असून त्यातून सुरू झालेली स्पर्धा हि रक्तरंजित  संघर्षाची सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.
[amazon_link asins=’B07BRR59DT,B0749NLWDS,B01D4EYNQA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’60c57929-b267-11e8-b669-2b76e22262ca’]
केडगाव परिसरात धुमळीचा मळा ते हंडाळवाडी या परिसरातून जाणाऱ्या फरशीच्या ओढ्याची या वाळू माफियांकडून अक्षरशः चाळण करण्यात येत आहे. दररोज हजारो ब्रास वाळू जेसीबी यंत्राच्या सहाय्याने उपसून ती ट्रक आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहून नेली जात आहे. महसूल कर्मचारी आणि अधिकारी मात्र हे सुरू असताना गप्प का?? या माफियांवर कारवाई का केली जात नाही?? याबाबत नागरिकांमधून उलट सुलट चर्चा सुरू आहे. केडगाव परिसरातून दोन मोठे ओढे जात असून धुमळीचा मळा ते हंडाळवाडी या परिसरातून जाणाऱ्या ओढ्यातून आणि लगतच्या शेत जमिनींमधून यंत्रांच्या सहाय्याने गेल्या १० ते १२ दिवसांपासून साधारन साठ लाख रूपायांच्या वाळूची चोरी करण्यात येऊन शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पुणे, सोलापुरात दरोडा टाकणाऱ्या दोन दरोडेखोरांना पकडले

केडगाव येथील काही शेतकरी हाताशी धरून या वाळू माफियांनी दिवस रात्र जेसीबी व इतर यंत्रांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू केला आहे जे शेतकरी सहजपणे शेतातील वाळू देत नाहीत त्यांना या वाळूमाफियांकडून धमकवण्याचे प्रकार हि वाढले आहेत. या गंभीर प्रकाराबाबत आता दौंडच्या  तहसीलदारांनीच यात लक्ष घालून वाळू उपसा करण्यात येत असलेल्या जागेवर कारवाई करून संबंधित वाळू माफिया व शेतकऱ्यांच्या जागेवर  बोजा चढवावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.