वाळू माफिया कडून तलाठ्यास बेदम मारहाण

परभणी (सेलु) : पोलीसनामा ऑनलाईन – तहसील हद्दीतील कुंडी सज्जातील कसुरा नदीतून वाळू उपसा करणाऱ्या टॅक्टर चालकास तलाठ्याने विचारपूस केली असता बेदम मारहाण केली. ही घटना (ता.2 , मे) रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी सेलु पोलीस ठाण्यात पाच व्यक्ति विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे तालुक्यातील कुंडी येथील कसुरा नदी पात्रातून वाळू उपसा होत असल्याने घटनास्थळी पोहोचल्या तलाठ्यास चालकासह इतर तिघांनी मिळून बेदम मारहाण केली.

विटा व पट्ट्याने मारहाण केली. मारहाणीत तलाठी सचिन नवगीरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सेलु येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,दरम्यान याप्रकरणी सेलु पोलीस ठाण्यात सचिन नवगीरे यांनी फिर्याद दिल्याने आरोपी सुनील मोगल, संभाजी मोगल, रामेश्वर मोगल, परमेश्वर मोगल, निर्मला मोगल विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, अॅट्रासीटी अॅक्ट नुसार गुन्हा नोंद झाला आहे.

सर्व सामान्या सह शासकीय कर्मचारी यांना दमदाटी मारहाण करण्या पर्यंत वाळू माफियांची मजल गेल्याचे दिसते

Loading...
You might also like