वाळू माफियांकडून वनरक्षक अधिकाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न

दौंड : अब्बास शेख – दौंड तालुक्यात पुन्हा एकदा वाळू माफिया सक्रिय झाले असून फॉरेस्टच्या जागेत वाळूचा साठा करण्यास विरोध करणाऱ्या वनरक्षकाच्या अंगावर सफारी गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा भयानक प्रकार राहू ता.दौंड येथे घडला आहे. यावेळी  फॉरेस्ट ऑफिसरचे व त्यांच्या सोबत असणाऱ्या कर्मचाऱ्याचे मोबाईल फोन आणि गुन्हा नोंद पुस्तक या वाळू माफियांनी हिसकावून पोबारा केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d5e7ed6b-d285-11e8-83e0-891aa34f6dc6′]

याबाबत सुरेश दगडू पवार वय ५१ वर्ष  रा.देलवडी ता दौंड जि पुणे यांनी फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी रामभाऊ सोनवणे व इतर ३ इसम रा.राहू ता.दौंड जि.पुणे. यांनी बुधवार दिनांक  १७/१०/२०१८ रोजी  सकाळी ०७:०० वा चे सुमारस दौंड तालुक्यातील राहू गावच्या  हद्दीत असणाऱ्या सटवाई  ओढयालगत राखीव वनक्षेत्र गट नं. ११९८ या ठिकाणी  संगनमत करून एक जेसीबी व दोन ट्रकच्या  सहाय्याने फॉरेस्टच्या हद्दीतील जागेत अवैद्य वाळूचा साठा करीत होता.

[amazon_link asins=’B07HMGLQ6B’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e6b27b55-d285-11e8-8b12-2d1342b4c8c4′]

यावेळी वनरक्षक यांनी त्याबाबत विचारणा केली असता वनरक्षक अरुण देशमुख यांना “जा तुला काय करायचे ते कर” असे म्हणून त्यांना जिवे ठार मारण्याच्या  उद्देशाने आरोपी सोनवणे याने  सफारी गाडी स्वतः चालवून वनरक्षक देशमुख यांच्या मोटर सायकलला ठोकर मारून तिचे नुकसान केले. हा प्रकार देशमुख हे त्यांचे मोबाईल मध्ये फोटो काढत असताना आरोपीने देशमुख यांच्या  अंगावर सफारी गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ दमदाटी करून जबरीने फिर्यादी पवार व वनरक्षक देशमुख यांचे २ असे एकूण ३ मोबाईल फोन व प्रथम गुन्हा नोंद पुस्तक जबरीने हिसकावून चोरून घेऊन गेले यवतचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांना हा प्रकार समजताच त्यांनी तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल करून चार आरोपींचा शोध सुरू केला आहे. घटनेचा अधिक तपास पोसई वाघमोडे करत आहेत.

शिक्षण सम्राट मारुती नवले यांची रवानगी येरवडा कारागृहात

You might also like