तहसीलदारांच्या वाहनावर वाळू माफियांची ‘दगडफेक’ ! कर्मचाऱ्याला ‘मारहाण’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन  – तहसीलदारांच्या वाहनावर दगडफेक करुन वाळूमाफियांनी एका कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री निमखेडी येथे घडली. गिरणा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली जात आहे, याची पाहणी करण्यासाठी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पथक तहसीलदारांचे वाहन घेऊन रात्री निमखेडी येथे गेले होते.

तिथे एका वाळू ट्रॅक्टरला अडविण्यात आले. या ट्रॅक्टरची पाहणी करीत असतानाच वाळू माफियांनी या वाहनावर दगडफेक केली. या दगडफेकीत वाहनाच्या काचा फुटल्या आहेत़ वाळू माफियांनी एका कर्मचाऱ्याला पकडून मारहाण केली. या कर्मचाऱ्यांने कशी बशी स्वत:ची सुटका करुन घेतली.

त्यानंतर कर्मचारी मोठ्या कसरतीने वाहनात बसले आणि तेथून त्यांनी पळ काढला. राज्यात वाळमाफियांची शिरजोरी वाढत चालली असून अनेक ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –