काय सांगता ! होय, ‘वाळू माफिया’ समजून ग्रामस्थांनी पोलिसांना ‘धो-धो’ धूतलं, सर्वत्र प्रचंड खळबळ

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – वाळू माफिया समजून ग्रामस्थांनी पोलिसांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. नांदर शिवारातील विरभद्रा नदीतून चोरून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली होती. पकडलेले वाहन पाचोड पोलीस ठाण्यात नेत असताना ग्रामस्थांनी त्यांच्यावर हल्ला केला. ग्रामस्थांनी चोर समजून पोलिसांवर हल्ला करत त्यांना चोप दिला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

नांदर शिवारातील विरभद्रा नदीच्या पात्रातून एका टॅक्टरमधून चोरून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी पोलीस नाईक लक्ष्मण बोराडे, पोलीस शिपाई रमेश जारवाल हे शिवारात गेले होते. रात्री बाराच्या सुमारास नदीपात्रात एका ट्रॅक्टरमध्ये चोरून वाळू भरली जात होती. पोलिसांनी ट्रॅक्टर पकडून पाचोड पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांना वाटेत अडवून वाळू चोर समजून त्यांच्यावर हल्ला केला.

ग्रामस्थांनी अचानक हल्ला केल्याने या ठिकाणी काहीवेळ गोंधळाची परिस्थिती होती. अखेर पोलिसांनी आम्ही वाळू माफिया नाही तर आम्ही पाचोड पोलीस असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. चोरून वाळू नेणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी साध्या वेशात आलो आहोत. साध्या वेशात येऊन वाळू माफियांवर कारवाई करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी ग्रामस्थांना देऊन आपले ओळखपत्र ग्रामस्थांना दाखवले.

घटनेची माहिती मिळताच शिवाजी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांनी घटनास्थळी येऊन ग्रमस्थांची समजूत काढून गैरसमज दूर केला. यानंतर पाचोड पोलिसांनी वाहन पोलीस ठाण्यात आलेले. पोलिसांनी संभाजी कचरू दिवटे (रा. दावरवाडी) याला अटक केली आहे. तर विकास लक्ष्मण जाधव, विलास उत्तम जाधव, अनिल तुकाराम जाधव, भैय्या गंगाराम साळुंके, विठ्ठल आप्पासाहेब तळपे (रा. नांदेड) हे फरार झाले आहेत. पुढील तपास पाचोड पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/