उस्मानाबादमध्ये वाळू माफियांचा ‘मस्तवाल’पणा, तहसीलदाराच्या अंगावर घातला ‘ट्रॅक्टर’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – परंडा तालुक्यात तहसीलदारावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. भोत्रास्थित सीना नदी पात्रातूमधून अवैधरित्या वाळूचे उत्खनन केले जात होते. याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्यावर वाळू माफियांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. वाळू माफियांनी यावेळी तहसीलदारच्या अंगावर चक्क ट्रॅक्टरच घातला. हल्ल्यात जखमी झालेल्या तहसीलदार अनिलकुमार यांच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भोत्रास्थित सीना नदी पात्रामध्ये तीन ट्रॅक्टर भोत्रा-परंडा मार्गावरील खडके वस्ती येथे वाळू धुण्यासाठी आले होते. याविषयीची माहिती बार्शीचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना मिळाली. यानंतर माहितीच्या आधारे हेळकर यांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसह खडके यांच्या वस्तीवर ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी कारवाई सुरू केली. दरम्यान, कारवाई सुरु असताना एकाने पळून जाण्याच्या प्रयत्नात हेळकर यांना वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यामध्ये ते गंभीर झाले आहेत. त्यांच्यावर बार्शी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/