दौंड : आलेगाव येथे अवैधरित्या वाळू उपश्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 30 लाखांचा माल जप्त

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील आलेगाव येथे भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपश्याची कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या वाळू उपसा करून त्या वाळूची चोरी करीत असताना पुणे ग्रामीण पोलीसांनी अचानक छापा मारून 30 लाख 20 हजारांचा माल हस्तगत केला आहे. यामध्ये पाच फायबर बोट, वीस ब्रास वाळू असा मुद्देमाल मिळून आला असून वाळू उपसा करणाऱ्या या बोटी जिलेटीनचे सहाय्याने दौंड तहसील ऑफिस मधील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मदतीने यांनी फोडण्यात आल्या आहेत.

सदरची कारवाई आज सकाळी करण्यात आली आहे. ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती जयंत मीना, मा. श्री सचिन बारी सो उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल महाडिक पोलीस निरीक्षक, दौंड पो स्टे. तसेच बारामती क्राईम ब्रँच पथकाचे चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक, बारामती. पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे, पो.कॉ. विशाल जावळे, पो.कॉ. शर्मा, पवार, तसेच, पोलीस उपनिरीक्षक रियाझ शेख, आणि पो. जवान अंकुश माने भिगवण पो. स्टे.पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे, धनंजय गाढवे, अमोल गवळी, आसिफ शेख दौंड पो.स्टे. यांनी केली.

सदर कामी दौंड तहसील कार्यालयातील नितिन मक्तेदार-सर्कल, विजय खारतोडे- सर्कल, अंबादास शिपकुले -कोतवाल यांची मदत घेण्यात आली.

Visit : Policenama.com