Sandal theft | खडकी अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीच्या जंगल परिसरातून 8 चंदनाच्या झाडांची चोरी

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  खडकी परिसरात असलेल्या लष्कराच्या अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीचा (khadki ammunition factory) भाग असलेल्या जंगलातून अज्ञातांनी 8 चंदनाची झाडे (sandalwood tree) चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान शहरातील सुरक्षित आणि सुरक्षा रक्षक असलेल्या जागामधूनच चंदन चोरी (Sandal theft) होत असल्याचे गेल्या काही घटनामधून दिसत आहे. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. Theft of 8 sandalwood trees from the forest area of ​​Khadki Ammunition Factory

याप्रकरणी केशव पतंगे (वय 59) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध खडकी पोलीस (Khadki police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सर्व प्रकार शनिवारी (दि 20 जून) मध्यरात्री ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी परिसरात अम्युनेशन फॅक्ट्री आहे.
येथे दारू गोळा बनविला जातो. येथे कडकडीत बंदोबस्त देखील असतो.
मात्र फॅक्टरीचा मॅगझिन परिसर हा पडीक भाग आहे. येथे मोठ्या प्रमाणात झाडी आहे.
त्याठिकाणीच चंदनाची आठ झाडे होती. यादरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फॅक्टरीच्या आवारात शिरून आठही चंदनाची झाडे कापून त्यातील गाभा असलेले खोड चोरून नेले आहे.
हा प्रकार उघड झाल्यानंतर फिर्यादी यांनी खडकी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
फिर्यादी हे येथे ज्युनिअर वर्कस मॅनेजर म्हणून काम करतात.
त्यांना हा प्रकार लक्षात आला आहे.
अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.

शहरात यापूर्वी चंदनचोरीच्या घटना घडल्या आहेत.
विशेष म्हणजे शासकीय कार्यलये आणि इमारतीमधून चंदनचोरी (Sandal theft) होत असल्याचे दिसत आहे. मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
अनेक घटना या उघडकीस आलेल्या नाहीत.
शासकीय कार्यालये असल्याने त्याचा तपासबाबत पोलीस देखील तितके गांभीर्य घेत नसल्याचे दिसून येते.

Web Title : Sandal theft | Theft of 8 sandalwood trees from the forest area of ​​Khadki Ammunition Factory

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | वाहन चोर्‍या करणार्‍या सराईताला गुन्हे शाखेकडून अटक, स्वतःच्या सोसायटीच्या पार्किंगमधूनही…