चंदनाचे झाड कापून चोरुन नेताना चोरटा उत्तमनगर पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

चंदनाचे झाड कापून चोरुन नेत असताना दोन चोरट्यांना उत्तमनगर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. उत्तमनगर पोलीस ठाण्यातील पोलीस मध्यरात्री गस्त घालत असताना अटक केली. दरम्यान, एनडीए रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यातील चंदनाचे झाड चोरट्यांनी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’324b4ff6-a84b-11e8-9275-ebd5d6add185′]

याप्रकरणी सुनिल नामदेव जमदाडे (वय ३४), दिलीप दत्तू पवार (वय ६०, दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा), कैलास प्रकाश चव्हाण (वय ३०,रा. मच्ंिछद्रगड, ता. वाळवा, जि. सांगली) यांना अटक करण्यात आली. पोलीस शिपाई सुहास चिरमे यांनी यासंदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शंकरशेठ रस्त्यावरील न्यू प्रसन्ना सोसायटीच्या आवारात मध्यरात्री तीन चोरटे शिरले. त्यांनी करवतीच्या सहाय्याने आवारातील चंदनाचे झाडाचा बुंधा कापला. त्यावेळी रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलिसांना आरोपींच्या हालचाली संशयास्पदरित्या दिसून आल्या. पोलिसांना पाहताच तिघेजण तेथून पसार होण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्याकडून चंदनाच्या झाडाचा बुंधा जप्त करण्यात आला. पोलीस हवालदार शेख तपास करत आहेत.
तसेच एनडीए रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यातील चंदनाच्या झाडाचा बुंधा अज्ञात चोरट्याने कापून चोरुन नला. याप्रकरणी हनुमंत मोरे (वय ५५,रा. कोपरे गाव, उत्तमनगर) यांनी यासंदर्भात उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. ए. दुगावकर तपास करत आहेत.