सँडलवुड ड्रग रॅकेट प्रकरण : पोलिसांच्या तावडीत ‘सेलिब्रिटी कपल’, कन्नड फिल्म इंडस्ट्रीचे टॉपचे कलाकार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सँडलवुड ड्रग रॅकेट प्रकरणातील आरोपींची केंद्रीय गुन्हे शाखा (सीसीबी) द्वारे अटक सुरु आहे. या दरम्यान आता एका सेलिब्रिटी जोडप्याला अटक करण्यात आली आहे. कन्नड चित्रपटातील सर्वोच्च अभिनेता दिगनाथ मन्छले आणि त्यांची पत्नी एंद्र‍िता रे यांना बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे दोघेही फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध चेहरे आहेत.

36 वर्षीय दिगनाथ मन्छले गेली 15 वर्षे चित्रपटसृष्टीत आहेत. कन्नड चित्रपटांच्या टॉपच्या अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. त्यांनी आतापर्यंत 25-30 चित्रपटांत काम केले आहे. त्यांचे नाव ड्रग रॅकेटमध्ये समोर येत आहे ही धक्कादायक बातमी आहे. त्यांच्याशिवाय त्यांची पत्नी एंद्र‍िता रे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 30 वर्षीय एंद्र‍िता देखील कन्नड चित्रपटातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यांनी आतापर्यंत जवळपास 30 चित्रपटांत काम केले आहे.

ड्रग प्रकरणात विवेक ओबेरॉय यांच्या शालकचे देखील नाव

सँडलवुड ड्रग रॅकेट प्रकरणात आतापर्यंत अनेक स्टार लोकांची नावे समोर आली आहेत. या दरम्यान बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांचे शालक आदित्य अल्वा देखील बंगळुरू पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. बेंगळुरूचे सहआयुक्त क्राइम संदीप पाटील यांनी सांगितले की, हेब्बल जवळील आदित्य अल्वा यांचे घर ‘हाऊस ऑफ लाइव्ह्स’ साठी सर्च वॉरंट जारी करण्यात आले असून तेथे शोध घेण्यात येत आहे. आदित्य अल्वा हे विवेक ओबेरॉय यांचे शालक आणि माजी मंत्री जीवराज अल्वा यांचे पुत्र आहेत. वृत्तानुसार आदित्य अल्वा यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. केंद्रीय गुन्हे शाखा (सीसीबी) त्यांचा शोध घेत आहे.

या प्रकरणात ड्रग पेडलर रविशंकर, शिवप्रकाश, राहुल शेट्टी, विरेन खन्ना यांच्यासह अभिनेत्री रागिनी द्विवेदी यांना अटक करण्यात आली आहे. रागिनीला एनडीपीएस कायद्यांतर्गत अटक करण्यात आली