home page top 1

संदीप बिष्णोई पिंपरी-चिंचवडचे नवे पोलिस आयुक्‍त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍त आर.के. पद्मनाभन यांची बदली करण्यात आली असून संदीप बिष्णोई यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने आज (शुक्रवारी) काढले आहेत.

पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीचे विभाजन करून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाची निर्मिती करण्यात आली होती. आर.के. पद्मनाभन यांना पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयात पहिले आयुक्‍त बनण्याचा मान मिळाला होता. सेवानिवृत्‍ती जवळ आल्याने तसेच इतर काही कारणांमुळे आर.के. पद्मनाभन यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. नवे आयुक्‍त संदीप बिष्णाई हे सध्या मुंबईत वैधमापनशास्त्र नियंत्रक म्हणून कार्यरत होते. बिष्णाई यांना तात्काळ पिंपरी-चिंचवडच्या आयुक्‍त पदाचा पदभार घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like