नवे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्विकारला पदभार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांची बदली झाली असून त्यांच्याजागी संदीप बिष्णोई यांची नियुक्ती शुक्रवारी झाली आहे. आज शनिवारी बिष्णोई यांनी आर.के. पद्मनाभन यांच्याकडून पदभार स्वीकारला.

पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीचे विभाजन करून पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली होती. आर.के. पद्मनाभन यांना पिंपरी चिंचवड आयुक्तालयात पहिले आयुक्त बनण्याचा मान मिळाला होता. निवडणुकीच्या कारणांमुळे आर.के. पद्मनाभन यांची बदली झाली आहे. नवे आयुक्त संदीप बिष्णाई हे मुंबईत वैधमापनशास्त्र नियंत्रक म्हणून कार्यरत होते. बिष्णाई यांना तात्काळ पिंपरी चिंचवडच्या आयुक्त पदाचा पदभार घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आज त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

Visit – policenama.com