‘ठाकरे’ पाहिल्यावर स्वाभिमानी आणि लाचार नेतृत्त्वामधील फरक जाणवतो!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाची सध्या राज्य़ात जोरदार चर्चा सुरु आहे. ठाकरे चित्रपट पाहिल्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यात आता मनसेचे आक्रमक नेते संदीप देशपांडे यांनी ‘ठाकरे’ सिनेमा पहिला आहे. त्यानंतर त्यांनी चित्रपटवरून प्रतिक्रिया देत शिवसेनेला कोपरखळी मारली आहे.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता, संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रतिक्रिया दिली आहे. कालच ठाकरे चित्रपट बघितला, त्यावेळचं स्वाभिमानी नेतृत्व आणि आत्ताचं लाचार नेतृत्व फरक लगेच जाणवतो, अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. देशपांडे यांनी या प्रतिक्रियेतून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एकार्थी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना केली आहे. त्यात उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व ‘लाचार’ नेतृत्त्व आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संदीप देशपांडे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. देशपांडे यांनी या पुर्वीही ‘ठाकरे’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या अपमानाच्या प्रकरणावरूनही बोलले होते. त्यावेळी #ISupportAbhijitPanse असा हॅशटॅगही चालवण्यात आला. यात देशपांडे यांनी सहभाग घेतला आहे. आता मात्र आताच्या प्रतिक्रियेवर शिवसेना काय उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.