Sandeep Deshpande | ‘असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही बघितले…’; मनसेच्या नेत्याचं थेट गृहमंत्र्यांना आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sandeep Deshpande | मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्यावेळी भाषणात पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. मशिदीवरील भोंगे (Loudspeaker) खाली उतरवा नाहीतर आम्ही मशिदीसमोर स्पीकर लावून मोठ्या आवाात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावू, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले होते. यावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करू असं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil)यांना आव्हान दिलं आहे.

गृहमंत्र्यांनी कायदा कसा राबावायचा हे शिकलं पाहिजे. माझी दिलीप वळसे-पाटील यांना विनंती आहे की जे उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) आदेश आहेत. त्या आदेशाचं पाहिलं पालन करा, न्यायालयाने भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिलेत त्याचं पालन करा मग आम्हाला धमक्या द्या, असं संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी म्हटलं आहे.

असे धमकी देणारे खूप गृहमंत्री (Home Minister Maharashtra) आम्ही बघितले आहेत. आम्हाला त्यांचा फरक पडत नाही.
आमची जी मागणी आहे ती कायद्याचं राज्य यावं, कायद्याचं पालन व्हावं ही आहे याचा त्यांनी विचार करायला पाहिजे, असं देशपांडे यांनी म्हटल आहे.

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या आव्हानानंतर दिलीप वळसे-पाटील काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणारं आहे.

Web Title : Sandeep Deshpande | mns sandeep leader deshpande slams maha home minister dilip walse patil over mosque loudspeaker issue

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharti Singh Good News | सुप्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, दिला गोंडस बाळाला जन्म..!

 

Retired DySP Dilip Shinde Passes Away | निवृत्त पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे यांचे पुण्यात निधन

 

Neetu Singh Kapoor Viral Dance Video | वयाच्या 63 व्या वर्षी नितू कपूरनं दिली चक्क नोरा फतेहीला टक्कर,
डान्स पाहून तुम्हीही होताल थक्क !