Sandeep Deshpande | संदीप देशपांडेवरील हल्लाप्रकरणी दोन जणांना अटक; भांडुपमधून केली अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर काल चार अज्ञातांनी शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे मॉर्निंग वॉक करत असताना हल्ला केला. यामध्ये संदीप देशपांडे जखमी झाले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुंबईतील भांडुप परिसरातून या दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एकाचे नाव अशोक खरात आहे. ते शिवसेना महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार सेनेचे उपाध्यक्ष आहेत. ते भांडुपच्या कोकण नगर विभागाचे रहिवासी आहेत. आज सकाळी साडेसहा वाजता गुन्हे शाखेने त्यांना अटक केली आहे. (Sandeep Deshpande)

 

काय आहे नेमके प्रकरण?
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) हे शिवाजी पार्कयेथे मॉर्निंग वॉक करत असताना काल त्यांच्यावर चार अज्ञातांनी हल्ला केला होता. क्रिकेटच्या स्टम्प्सने देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी आरोपीनी आपला चेहरा झाकला होता. हा हल्ला केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. संदीप देशपांडे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या घटनेवरून मनसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरु केला. हि संपूर्ण मारहाणीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. मनसे नेत्यांनी या हल्ल्याप्रकरणी थेट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या चौकशीची मागणी केली आहे. तर नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांच्यावर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून संदीप देशपांडेंची चौकशी
संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडेंची चौकशी केली होती. तसेच या हल्ल्यामागे ज्या कोणाचा हात आहे त्याची चौकशी करुन आरोपींना कठोरातील कठोर शासन होईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडे यांना दिले. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर नेमके कोण? हल्ल्यामागील त्यांचा नेमका हेतू काय? या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 

Web Title :- Sandeep Deshpande | two persons police custody in mns sandeep deshpande attack case in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | देशात सरकार बदलण्याचा मूड, आगामी बदलांसाठी ‘ही’ गोष्ट अनुकूल; शरद पवारांचं मोठं विधान

Maharashtra Prison Department | आता विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले

PMPML | पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत प्रवास, 8 मार्च पासून बससेवा पुर्ववत