बनावट चकमक प्रकरण : गँगस्टर आणि राजकारणी बिंदर गुर्जरला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संदीप गाडोली खुन प्रकरणात गुरुग्राम येथील गँगस्टर आणि राजकारणी बिंदर गुर्जर याला मुंबई पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे. त्याला बुधवारी मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या बनावट एन्काउंटरमध्ये सहभागी झालेल्या पोलिसांना मुंबई पोलिसांनी अगोदरच अटक केली आहे.

sandip gadoli

गुरुग्राम पोलिसांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये मुंबईतील अंधेरीमधील एका हॉटेलमध्ये गुर्जर याच्या सांगण्यावरुन बनावट चकमकीत संदीप गाडोली याला ठार मारण्यात आले होते. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुर्जर याला गुरुग्राम येथून ताब्यात घेऊन मुंबईला आणले आहे.

गुरुग्राम पोलिसांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील हॉटेल मध्ये गुंड संदीप गाडोली याला गोळ्या घालून ठार केले होते. या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने विशेष पथकाची स्थापना केली होती. त्यांनी केलेल्या चौकशीत त्यांना काही क्लिपिंग मिळाले.

क्लिपिंगमध्ये हॉटेलच्या दाराजवळच दोन पोलीस जखमी झाले होते. गोळी झाडून सुमारे २० मिनिटे गाडोली हा वेदनेने तळमळत पडला होता. त्याला कोणी मदत केली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे नष्ट केले. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप गाडोली हा हरियाणा येथील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर हरियाणामध्ये ३ डझनहून अधिक गुन्हे दाखल होते. गुरुग्राममध्ये त्याने जवळपास १५ वर्षे दहशत निर्माण करुन व्यापाऱ्यांकडून जबरदस्तीने खंडणी उकळत असे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी याअगोदरच एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना अटक केली होती.

Visit : Policenama.com

You might also like