Sandeep Khardekar | सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव ही पुणे मनपातील भाजपाच्या भावी यशाची नांदी – संदीप खर्डेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sandeep Khardekar | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट च्या निवडणुकीत 10 पैकी 9 जागा जिंकून विद्यापीठ विकास मंच ने दणदणीत विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी ह्या निवडणुकीत आपले पॅनल उतरविले होते. अनेक ठिकाणी निवडणूक कार्यालयांचे उदघाट्न करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विजयाच्या वलग्ना केल्या होत्या. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही निवडणुकीत जातीने लक्ष घातले होते. मात्र त्यांच्या पॅनल चा दारुण पराभव हा पुणे मनपा निवडणुकीत भाजपा ला मिळणाऱ्या यशाची नांदी असून महाविकास आघाडीने मतदारांचा कौल लक्षात घ्यावा अशी प्रतिक्रिया भाजपा चे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिली आहे. (Sandeep Khardekar)

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालेले यश, भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत खा. धनंजय महाडिक यांनी मिळविलेले यश आणि आता पुणे विद्यापीठ सिनेट च्या निवडणुकीत मिळालेले यश हे आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने सपशेल नाकारल्याचे निदर्शक असून यातून बोध घेऊन राष्ट्रवादी च्या पुण्यातील नेत्यांनी अश्लाघ्य टीका करायचे थांबवावे असे आवाहन ही संदीप खर्डेकर यांनी केले आहे. (Sandeep Khardekar)

सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना येणाऱ्या काळात पुणे विद्यापीठ अधिक प्रगती करेल व
पारदर्शी कारभाराचा आदर्श निर्माण करेल असा विश्वास ही खर्डेकर यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Sandeep Khardekar | Mahavikas Aghadi’s crushing defeat in Savitribai Phule Pune University Senate elections is the beginning of BJP’s future success in Pune Municipality – Sandeep Khardekar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prateik Babbar | एका मुलाखतीत प्रतीक बब्बरने त्याच्या भूतकाळातील अनेक गोष्टींचा केला धक्कादायक खुलासा; म्हणाला…

Aai Kuthe Kay Karte | अभिनेते मिलिंद गवळी यांच्या पोस्टने वेधले लक्ष ; “एका जन्मात अनेक जन्म……

T20 World Cup 2024 | ICC कडून टी-20 विश्वचषक 2024 च्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल; जाणून घ्या