आ. संदीप क्षीरसागर स्वतः उभे राहिले, महामार्गावरील खड्डे बुजवून घेतले

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडल्याने वाहतुकीसह पादचार्‍यांनाही मोठा त्रास होत असल्याचे पाहून नवनिर्वाचित आमदार संदीप भैय्या क्षीरसागर स्वत: रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी बाहेर पडले. आयआयआरबीच्या अधिकार्‍यांसह राष्ट्रीय महामार्ग अभियंत्यांना सोबत घेऊन संदीप क्षीरसागरांनी मंगळवारी सोमेश्वर मंदिर, अमन लॉन्स, मुक्ता लॉन्स, जालना रोड, बार्शी रोड रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. यावेळी आ. संदीप क्षीरसागर स्वतः उभे राहून काम करून घेतले. यावेळी माजी आ. सय्यद सलीम, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता कसबे, डी.एम. राऊत, आयआरबीचे चौरे, न. प. गटनेते फारुक पटेल, नगरसेवक अमर नाईकवाडे, अशफाक इनामदार आदींसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची टीम उपस्थित होती.
Highway
बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर सोमेश्वर मंदिर, अमन लॉन्स, मुक्ता लॉन्स, जालना रोड, बार्शी रोड आदी परिसरात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांनाच नव्हे तर पादचार्‍यांनाही या रस्त्यावरून चालता येत नव्हतं. भर निवडणुकीत याबाबत ओरड झाली होती. मात्र या खड्ड्यांकडे कोणी लक्ष दिले नाही, पंधरा दिवसांपूर्वीच नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आलेले संदीप भैय्या क्षीरसागर दुसर्‍याच दिवसापासून कामाला लागलेले आहेत. अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेल्या शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांनी शेतात जावून पिकांची पाहणी केली, अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. सर्वांचे पंचनामे करा, त्यात राजकारण करू नका, अशा सूचनाही दिल्या. त्यापाठोपाठ गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यावरचे खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत म्हणून राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यासह आयआरबीच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा केली.

मंगळवारी स्वत: पोकलेन, रोडरोलरसह अन्य साहित्यासह संदीप भैय्या क्षीरसागर खड्डे बुजवण्यासाठी तात्काळ रस्त्यावर उतरले. आता खड्ड्यात खडीकरण करत लवकरच त्यावर तात्काळ डांबर टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यांच्यासोबत खदीर जवारीवाले, जैतुल्ला खान, भैय्या मोरे, बरकत पठाण, भाऊसाहेब डावकर, रणजित बनसोडे, शेख इकबाल, अ‍ॅड इरफान बागवान, हनुमंत वाघमारे, नवाज खान यांच्यासह आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित आहेत.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास