लोकांच्या मनात सुरक्षितेची भावना निर्माण करणार: संदीप पाटील

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

जिल्ह्यातील महिला, उद्योग आणि नागरिकांची सुरक्षितता महत्वाची असून लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली पाहिजे असे मत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून काल (रविवार) त्यांनी पदभार स्वीकारला.यावेळी त्यांनी  जिल्ह्यातील विविध माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवादात साधला.

[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c0b41b38-93e6-11e8-848d-1598291f71ad’]

साताऱ्यामध्ये धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर त्यांची बदली पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली आहे. साताऱ्यात काम करत असताना त्यांनी खात्याला शिस्त लावत अनेक मातब्बर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहे. तसेच सराईत गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार अंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस दलामध्ये काम करत असताना अगदी फ्रंट ला येऊन परिस्थिती हातळणारा अधिकारी म्हणून त्यांची एक वेगळीच अोळख आहे. यावेळी त्यांनी बोलताना जिल्ह्यातील अनेक विषयांवर चर्चा केली.

राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी आंदोलने करण्यात येत असून, मराठा समाजाने जिल्ह्यात शांततेच्या मार्गानी आंदोन करावे, कोणत्याही प्रकारची हिंसा करु नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.