‘PNB’पेक्षा मोठा आर्थिक घोटाळा, संदेसरा ब्रदर्सने बँकांना १५ हजार कोटींना गंडविलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात पुन्हा एकदा पीएनबी पेक्षा मोठा घोटाळा समोर आला आहे, ज्यात बँकांना तब्बल १५ हजार कोटींना गंडा घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा घोटाळा नीरव मोदी आणि मेहुल चौक्सी यांनी केलेल्या घोटाळ्यांपेक्षा मोठा मानला जात आहे. खोट्या कंपन्या खोलून बँकांना हजारो कोटीला चून लावणाऱ्या स्टर्लिंग बायोटेक कंपनीचे मालक संदेसरा ब्रदर्सच्या घोटाळ्याबद्दल सक्तवसुली संचलनालयने (ED) हा धक्कादायक खुलासा केला आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार स्टर्लिंगल बायोटेक कंपनी लिमिटेड आणि संदेसरा ग्रुपचे मुख्य प्रमोटर नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि दिप्ती संदेसरा यांनी खोट्या कंपन्या बनवून बँकेना जवळपास १४,५०० कोटीचा चूना लागवला आहे. तर हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहूल चौक्सी यांनी केलेल्या पीएनबीच्या ११,४०० कोटीच्या घोटाळ्या पेक्षा अधिक आहे.

ईडीने जप्त केली ९००० कोटीची संपत्ती
ईडीने या प्रकरणात केलेल्या तपासानंतर स्टर्लिंग बायोटेकची ९००० कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती जप्त केली आहे. यात नायजेरियातील तेल रिंग, जहाज, एक व्यवसायिक विमान आणि लंडनमधील एका अलीशान फ्लॅटचा समावेश आहे.

भारतीय बँकांच्या विदेशी शाखेमधून घेतले होते कर्ज
या कारवाई दरम्यान ईडीला काही दस्तावेज मिळाले आहेत. यावरुन कळते की, संदेसरा ग्रुपने शेल कंपनींच्या आधारे भारतीय बँकांच्या विदेशी शाखांकडून ९००० कोटीचे कर्ज घेतले होते. ईडीच्या एक अधिकाऱ्यांच्या मते, स्टर्लिंग बायोटेक लिमिटेडने भारतीय बँकाकडून भारतीय आणि विदेशीत अशा दोन्ही चलनात कर्ज घेतले होते. संदेसरा ब्रदर्सने हे कर्ज आंध्रा बँक, बँक ऑफ इंडिया, इलाहबाद बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. म्हणजेच संदेसरा ब्रदर्सने या बँकांना चूना लावला आहे.

ऑक्टोबर २०१७ सालीच संदेसरा ग्रुपवर सीबीआय ने एफआयआर दाखल केली होती त्यानंतर ईडीने ही केस दाखल केली. सीबीआयने ५३८३ कोटी रुपयांचा घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात संदेसरा ग्रुपच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे.