राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकरांची पक्षाला ‘सोडचिठ्ठी’ !

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची मोठी रीघ लागली असताना आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या चार आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कोल्हापूरमधील चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमदार संध्या कुपेकर यादेखील राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. १० ऑगस्ट रोजी त्या या संदर्भातील निर्णय जाहीर करणार आहेत.

मागील काही दिवसांपासून त्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. त्यामुळे आता त्यांनी पक्षाला रामराम केला तर या ठिकाणी पुन्हा नवीन उमेदवार शोधण्याची वेळ येणार आहे. जर कुपेकरांनी पक्ष सोडला तर भाजप त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांना मैदानात उतरवणार असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी इच्छुकांच्या मुलाखतीत देखील त्यांनी आपण इच्छुक नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्या पक्ष सोडणार कि काय अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे कै. बाबासाहेब कुपेकर हे शरद पवार यांचे विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जात असत. मात्र आता त्यांच्या निधनानंतर संध्यादेवी कुपेकर या पक्ष सोडणार असल्याने शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोल्हापूरमधील दहापैकी सहा मतदारसंघ शिवसेनेचे असून भाजप देखील आपल्या चारपैकी सर्व जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कुपेकरांच्या पक्ष प्रवेशाने भाजप याकडे एक पाऊल टाकणार आहे. त्याचबरोबर नुकतेच प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले चंद्रकांत पाटील हे देखील यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, कुपेकरांच्या या निर्णयामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का समजला जात आहे. त्यामुळे आता शरद पवार यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –