Sandipan Bhumare | ‘शहाणपणा करु नको, तू ये मग दाखवतो’ ! संदिपान भुमरे आणि शिवसैनिकाची Audio Clip व्हायरल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने अनेक शिवसैनिक, नेते शिंदे गटात सामील झाले. यात काही मंत्र्यांचा देखील समावेश होता, यात संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांचाही समावेश होता. दरम्यान, राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार (Shinde – Fadnavis Government) स्थापन झाले. याविरोधात सध्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Shiv Sena Leader Aditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रा (Shiv Samvad Yatra) काढली आहे. या यात्रेवरुन आता संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) आणि एका शिवसैनिकामध्ये झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

 

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरी करणाऱ्या नेत्यांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा काढली आहे. काल संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या पैठण मतदारसंघात (Paithan Constituency) ही शिवसंवाद यात्रा होती. या यात्रेनंतर एका शिवसैनिकाने (Shiv Sainik) संदिपान भुमरे यांना फोन केला आणि तुम्ही असं करायला नव्हत पाहिजे, असे म्हणाला. योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) असे या शिवसैनिकाचे नाव असून, ऑडिओ क्लिप मध्ये भुमरे त्या सैनिकाला आधी दम देताना आणि नंतर समजावून सांगताना दिसत आहेत.

 

व्हायरल ऑडिओत नेमकं काय आहे?
योगेश क्षीरसागर या शिवसैनिकाने संदिपान भुमरे यांना फोन लावून म्हटले
की, साहेब पैठण मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची रॅली निघाली, तुम्हाला मतदान करणारे लोक त्यांच्यासोबत दिसले.
तुम्ही असं करायला नको होतं, असे योगेश म्हणाला. यावर भुमरे म्हणाले, तु भेट तुला दाखवतो मी असं का केलं.
तू भेटायला ये मग सांगतो तुला सगळं, असं भुमरे म्हणाले. तसेच आदित्य ठाकरेंची रॅली निघाली, त्याला गर्दी झाली.
आता आपण देखील रॅली काढू, असंही भुमरे म्हणाले.

 

Web Title :- Sandipan Bhumare | shivsena worker calls sandipan bhumare and asked why you joined eknath shinde group audio clip viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | फक्त 12 दिवस आणखी ! सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढतील 27000 रुपये, मोदी सरकार करणार घोषणा

 

Shivsena | चालते व्हा, शिवसेनेकडून कारवाई सुरुच, शिंदे गटात सामील खासदारांची पदावरून हकालपट्टी

 

Chandrakant Patil | ‘दु:ख झालं, मनावर दगड ठेवून केंद्रीय नेतृत्वाचं ऐकलं’, चंद्रकांत पाटलांचा ‘त्या’ वक्तव्याची पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल