Sandipan Bhumre | असा कोणता डॉक्टर मिळाला…ठाकरे कुटुंबाचे आजारच पळाले; संदीपान भुमरेंनी घेतला शिवसेनेचा खरपुस समाचार, खरे गद्दार…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यासह शिवसेना नेते चंद्रकात खैरे (Shivsena Leader Chandrakat Khaire), विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) या सर्वांवर एकाचवेळी जोरदार हल्लाबोल केला आहे. औरंगाबादच्या पालकमंत्री (Aurangabad Guardian Minister) पदी निवड झाल्याबद्दल कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचा सत्कार सोहळा आणि हिंदू गर्जना मेळावा आज येथील संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना भुमरे बोलत होते.

 

संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) म्हणाले, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उठावामुळे उध्दव ठाकरे यांचे आजार दूर झाले, गळ्याचा पट्टा गेला. सरळ उभे राहिले, उध्दव साहेब बाहेर आले, आदित्य आणि तेजस बाहेर आला, रश्मी ताई बाहेर आल्या. एकनाथ शिंदे यांच्यामुळे घरातील आजार गेले किती फायदा झाला त्यांचा. ठाकरे यांनी अपक्ष आमदाराला सोबत घेतले, मंत्रिपद, पालकमंत्री पद दिले. यासाठी त्यांनी किती खोके घेतले. खरे गद्दार तर मातोश्रीवर आहेत.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करताना संदीपान भुमरे म्हणाले,
आज आमच्यावर टीका करणारे खैरे तेव्हा म्हणायचे मातोश्री खूप वाईट आहे.
मी नेता असूनही मला प्रवेश बंद आहे. मात्र, आमच्या उठवानंतर आता त्यांना किंमत आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेसाठी जिल्ह्यातील आमदारांसोबतच एकनाथ शिंदे यांच्याकडूनही खैरेंनी 20 लाख रुपये घेतले.
त्यांना लोकसभेत कोणी पाडले आधी याचा विचार करावा.

 

भुमरे पुढे म्हणाले, सभा आम्ही घ्यायच्या, पण त्याचे फोटो उद्धव ठाकरेंना दाखवून अंबादास दानवे त्याचे श्रेय घेत.
आम्ही पैसे दिले, गाड्या लावल्या, माणस आणली आणि नाव यांचे झाले. त्याने खासदारकी, आमदारकी लढवावी.
खैरे आणि दानवेत बाईट देण्याची स्पर्धाच लागली आहे.

 

Web Title :- Sandipan Bhumre | after the our uprising the thackeray familys illnesses ran away sandipan bhumre slams matoshree khaire danve

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | हडपसर पोलिसांकडून चार गंभीर गुन्ह्यांची उकल; खुन, दरोड्यासह दोन जबरी चोरीतील ८ जणांना अटक

Kishori Pednekar | भाजपाच्या राम कदमांना शिवसेनेचे रोखठोक प्रत्युत्तर, पेंग्विन सेना महाराष्ट्राची, मुंबईची भरभराट करणार

Former MLA Mohan Joshi | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापारी आणि जनता भिकारी’ -मोहन जोशी