×
HomeशहरअमरावतीSandipan Bhumre On Uddhav Thackeray | संदिपान भुमरेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका;...

Sandipan Bhumre On Uddhav Thackeray | संदिपान भुमरेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका; म्हणाले – ‘नवरीनं माहेर सोडावं, तसं उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – Sandipan Bhumre On Uddhav Thackeray | ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा (Thackeray Group) मोठा विजय झाला आहे. कारण हायकोर्टाने (Mumbai High Court) दसरा मेळाव्यासाठी (Dussra Melava 2022) शिवाजी पार्कचं (Shivaji Park) मैदान ठाकरे गटाला देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय मानला जात आहे. तर शिंदे गटाला (Shinde Group) मोठा धक्का बसला आहे. (Sandipan Bhumre On Uddhav Thackeray)

 

त्यामुळे आता मुंबई येथे 5 ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह समर्थक मंत्री राज्यभरात शिवसेना (Shivsena) हिंदु गर्व गर्जना संपर्क यात्रा राबवताना दिसत आहेत. या निमित्ताने राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे यांनी शिवसैनिकांशी (Shiv Sainik) संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

 

काय म्हणाले संदिपान भुमरे?

‘उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना घरातच बसून होते. कोरोनात ‘राजा घरी, जनता दारोदारी’ अशी स्थिती होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाताच, उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगला सोडताना जसे नवरीने माहेर सोडावं. तसा हा इव्हेंट केला, अशी टीका संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच मुख्यमंत्री असताना तोंडाला मास्क होता, मानेला पट्टा होता, पण मुख्यमंत्रिपद जाताच आता मास्क राहिला नाही, आता सगळीच तारांबळ उडाली आहे, अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली.

 

Web Title :- Sandipan Bhumre On Uddhav Thackeray | sandipan bhumre on shivsena chief uddhav thackeray leave from varsha bungalow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News