बेकायदा वाळू वाहतुकीचे जप्त केलेले ट्रक चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाकडून कारवाई करून जप्त केलेले चार ट्रक पळवून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी भागातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात जप्त केलेले ट्रक हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आले होते. तेथून ते चोरून नेण्यात आले आहेत. हा प्रकार बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकी आला आहे.

याबाबात महसूल विभागातील मंडल अधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रकचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हडपसर ते शेवाळवाडी रोडवरील रुकारी पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर महसूल विभागाकडून बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांवर कारवाई करण्यात आली होती. कारवाई दरम्यान एक ट्रक चालक फिर्य़ादी यांना पाहून ट्रक जागेवर सोडून पळून गेला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेले ट्रक हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारात लावले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारात लावलेले चार ट्रक पळवून नेले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लोंढे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय