पिंपरी-चिंचवड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे ‘कोरोना’मुळे निधन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.
साने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते.
25 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनासह निमोनियाची देखील लागण झाली होती. साने यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. साने हे राष्ट्रवादीचे धडाकेबाज नगरसेवक असून त्यांनी अनेकदा महापालिकेतील भ्रष्ट्राचाराची प्रकरणे उजेडात आणली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like