सांगलीत बंगला फोडला, सराफाच्या कामगाराचा मुलगा अटकेत

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – खानापूर तालुक्यातील वाळूंज येथील बंद बंगल्याच्या टेरेसवरील
गेटचे लॉक तोडून तिजोरीत ठेवलेली रोकड आणि दीड किलो सोन्याचे दागिने असा 52 लाखांचा ऐवज लुटणाऱ्यास अटक करण्यात आली. दरम्यान बंगल्याच्या मालकाकडे काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाने ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. बिराप्पा सिद्धाप्पा बन्ने (वय 31, रा. सोन्याळ, ता. जत, सध्या रा. वाळूंज, खानापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून 32 लाख 89 हजार रूपयाचे सोन्याचे दागिने, सोन्याची घडाळे असा मुद्देमाल जप्त
करण्यात आला आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता असल्याचे अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.

फिर्यादी जयदीप बाबर वाळूंज येथे राहतात. त्यांचा चेन्नई येथे दागिने उत्पादनाचा उद्योग आहे. त्यांचा वाळूंज येथे बंगला आहे. घरकामासाठी त्यांच्याकडे कामगारही आहेत. घराची देखभाल करण्यासाठी त्यांनी बिराप्पा बने या कामगाराकडे बंगल्याच्या किल्ल्या दिल्या होत्या. दरम्यान, बाबर 30 सप्टेंबर रोजी चेन्नई येथे असताना बंगल्याच्या टेरेसवरील गेटचे लॉक कोणीतरी तोडले असल्याचे कामगाराने सांगितले. ते
तातडीने गावी आले. त्यांनी बंगल्याचा दरवाजा उघडून पाहिला असता बेडरूमधील तिजोरीतील सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांने एक लाख 20 हजारांचे सोन्याचे तोडे, तीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या, एक लाख 20 हजारांची सोन्याची सरी, एक लाख 60 हजारांचे सोन्याचे दोन नेकलेस, एक लाख 20 हजारांच्या सोन्याच्या सहा अंगठ्या, एक लाख 20 हजारांच्या सोन्याच्या दोन वाक्‍या, एक लाखाची सोन्याची दोन जोड, कानातील फुले, एक लाख 60 हजारांचे सोन्याचे वजरहिंक, 80 हजारांचे सोन्याचे दोन नेकलेस, एक लाख 40 हजारांचे सोन्याचे दोन झुपके, 60 हजारांची सोन्याची चेन, 30 हजारांच्या सोन्याच्या दोन चेन, दोन लाखाच्या सोन्याच्या दोन पाटल्या, दोन लाखांचा सोन्याचा एक कोल्हापुरी साज, दोन लाखांची सोन्याची दोन ब्रेसलेट, एक लाख 60 हजारांच्या सोन्याच्या दोन पाटल्या, 30 हजारांच्या सोन्याच्या दोन नथ, दोन लाखांचा सोन्याचा चपलाहार, एक लाख 60 हजारांची सोन्याची एक मोहनमाळ, एक लाख 80 हजारांची सोन्याची दोन मंगळसूत्रे, आठ लाखांची सोन्याचे बेल्ट असलेली तीन मनगटी घड्याळे व तीन लाख रुपये रोख असा 52 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला.

गुन्ह्यातील तपासासाठी पथके तयार करण्यात आली. पथकातील पोलिस गस्तीवर असताना संशयित बिराप्पा बन्ने हा पसार असल्याचे निदर्शनास आले. सोन्याळ (ता. जत) येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. सखोल चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 32 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. अधीक्षक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विट्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी