सांगली : दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अभियंता ठार

जतः पोलीसनामा ऑनलाईन

दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका तरुण अभियंत्याचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि.२३) दुपारी सोरडी-जत रस्त्यावर झाला. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील दांपत्या गंभीर जखमी झाले आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0995a82e-a6ee-11e8-abe5-edcda1afec4a’]
गणेश व्यंकटेश जेऊर (वय-30, मुळ गाव-दरिबडची, सध्या रा.विद्यानगर, जत) असे मृत्यू झालेल्या अभियंत्याचे नाव आहेत. या प्रकरणात विनायक वाघमारे यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अधिक माहिती अशी,अभियंता गणेश जेऊर हे पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरीस आहेत. ते मुळचे दरिबडची येथील आहेत. त्यांचा मे 2018 रोजी शेगाव येथील अभियंता तरूणीशी विवाह झाला आहे. जेऊर कुटुंब जतमधील विद्यानगर येथे राहते. गणेश यांची दरिबडची येथे वडिलार्जित शेती आहे. तेथे द्राक्षबाग लावली आहे. त्यांची देखरेख करण्यासाठी गणेश पुणे येथून गावी येतात. गुरूवारी गणेश जेऊर हे दुचाकीवरून (एमएच-10, एएल-6399) दरिबडचीकडे जात होते. त्यादरम्यान धर्मा मनोहर काळे (वय-35, रा. सोरडी) व त्यांची पत्नी दुचाकीवरून (एमएच-12, बीएल- 2136) जतकडे येत होते. संगतीर्थपासून एक किलोमीटर अंतरावरील वळसंग वनजमीनीजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात गणेश जेऊर व काळे दांपत्य गंभीर जखमी झाले. गणेश यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. तिघांना उपचारासाठी जतला नेत असताना गणेश यांचा वाटेत मुत्यू झाला. काळे दांपत्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत. पुढील तपास जत पोलीस करीत आहेत.