सांगली महापुरावरून टीका करणाऱ्या तरुणाला पुण्यात बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली महापुरात मदत करण्यावरून राजकीय टीका करणाऱ्या तरुणाला पलूस येथून आलेल्या पाच जणांनी कारमधून अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सुरज संजय लाड, जगदिश लाड, आशुतोष लाड, संदीप लाड, गुरुप्रसाद लाड (सर्व रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यांच्या विरुद्ध अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आदित्य उर्फ अतुल उत्तम लाड (वय-२२ रा. कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पलूस भागात महापूर आल्यानंतर स्थानिक आमदार डॉ. विश्वजीत कदम हे नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेले होते. त्यावरून आदित्य लाड यांनी त्यांच्या गावातील ‘लाड सरकार’ आणि ‘एल ग्रुप’ यासह इतर ग्रुपवर ‘पुरातील जनतेला आमदार साहेब मदत करतात, बाकीचे लाडोबा कुठे गेले ?’ अशी पोस्ट टाकली होती. यावरून आरोपींनी फिर्य़ादी यांना फोन करून धमकावले होते.

मंगळवारी सायंकाळी आरोपींनी फिर्यादी यांच्या घरी येऊन त्यांना पांढऱ्या रंगाच्या कारमधून जबरदस्तीने घेऊन गेले. घरापासून दीड किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर आरोपींनी गाडी थांबवून कारमधून फिर्यादी यांनी खाली उतरवले. त्या ठिकाणी त्यांना तू बदनामी करणारा मेसेज का टाकला अशी विचारणा करत लाथा बुक्क्यांनी आणि टायरच्या ट्युबने बेदम मारहाण केले. त्यानंतर घराजवळ सोडताना देखील बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) एस.एस. खटके करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like