सांगलीत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली शहरातील विश्रामबागमधील वानलेसवाडीमध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या  हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी एजंट महिलेसह दोघांना अटक करुन एका महिलेची सुटका केली. तर एक महिला फरार झाली. ही कारवाई बुधवारी (दि.८) दुपारी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाने केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B0756ZJKCY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f672dd09-9b28-11e8-be2f-b5a238287ba4′]

एजंट शोभा अशोक भिरडे (वय ५५, रा. वसंतदादा कारखान्यासमोर, लक्ष्मीनगर, सांगली), घरमालक बाबासाहेब आकाराम सरगर (वय ५०, रा. हायस्कूल रस्ता, वानलेसवाडी)  अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. घरमालकीन रंजना राजाराम शेजाळ पसार झाली आहे.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांना शहरातील वानलेसवाडी येथील बाबासाहेब सरगर आणि रंजना शेजाळ यांच्या घरात हायप्रोफाईल वेश्या अड्डा सुरू असल्याची माहिती खबर्‍याद्वारे मिळाली होती. त्यांनी बुधवारी दुपारी पथकासह सरगर तसेच रंजना शेजाळच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी वेश्या व्यवसायास भाग पाडण्यात आलेल्या महिलेची सुटका करून एजंट शोभा भिरडे, घरमालक बाबासाहेब सरगर यांना अटक केली. यावेळी घर मालकीन शेजाळ पसार झाली.
[amazon_link asins=’B077PWK5QD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fc09878f-9b28-11e8-b450-f1d18eedd96e’]

याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विद्या जाधव, भगवान नाडगे, विकास पाटणकर, लता गावडे, अभिजित गायकवाड, अनिता गायकवाड, कविता पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.