सांगली : Sangali News | करगणी (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीमध्ये (Kargani Gram Panchayat) मोठा भाऊ उपसरपंच (Upsarpanch) झाल्यानंतर गावाबरोबरच श्रीराम मंदिराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालून छोट्या भावाने आपला आनंद साजरा करत ग्रामदैवताचे आणि ग्रामस्थांचे मनोमन आभार मानले. (Sangali News)
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील हे बंधुप्रेम सध्या चर्चेत आले आहे. अंकुश खिलारे असे हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातलेल्या भावाचे नाव आहे तर साहेबराव खिलारे असे उपसरपंच झालेल्या भावाचे नाव आहे. अंकुश खिलारे हे गलाई व्यावसायिक आहेत. ते व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यात राहतात.
गावातील शेती-कुटूंबाची जबाबदारी अंकुश खिलारे यांचे जेष्ठ बंधू साहेबराव खिलारे सांभाळतात. शेती सांभाळणारा आपला भाऊ गावचा उपसरपंच झाल्याने अंकुश यांना प्रचंड आनंद झाला. हा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी गावावर तब्बल ३ ते ४ तास हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातल्या. या प्रकारामुळे सर्वचजण अचंबित झाले. (Sangali News)
खिलारे कुटुंबातील कोणीतरी गावचा सरपंच, उपसरपंच व्हावा ही कुटूंबाची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती.
२० वर्षांपूर्वी दुर्योधन खिलारे यांच्या रूपात ही संधी आली होती, पण ती थोडक्यात हुकली होती.
परंतु, यंदा गावच्या उपसरपंच पदावर साहेबराव खिलारे यांची निवड झाल्यावर खिलारे कुटुंबियांनी अशाप्रकारे आपला
आनंद साजरा केला. आपला आनंद साजरा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून खिलारे कुटुंबियांनी गावाला आणि
गावच्या राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टर मधून प्रदक्षिणा घातली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक