मिरजेत दोन चोरट्यांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – मिरजेतील बस स्थानक परिसरात एकाला मारहाण करत जबरी चोरी करणाऱ्या मिरजेतील दोघा सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. आयुब शेख आणि जमीर शेख अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच गुन्ह्यातील फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी दोन पथके तैनात केली होती. बुधवारी त्यांचे पथक मिरजेत गस्त घालत होते. यावेळी जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती काढत असताना मिरज बस स्थानक परिसरातील सार्वजनिक बाथरूम मध्ये जाऊन एका इसमाचा चार्जिंगला लावलेला मोबाईल घेऊन त्याच मारहाण करत ५ हजार रुपयांची रक्कम लुटलेल्या प्रकरणातील दोघे संशयित आढळून आले.

त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी रायबाग येथील नासिर पठाण यांना लुटल्याची कबुली दिली. या गुन्ह्याची मिरजेतील गांधी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होती. त्याप्रमाणे आयुब शेख आणि जमीर शेख यांना पुढील तपासासाठी महात्मा गांधी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, साईनाथ ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त –