सांगलीच्या आण्णांचा बोलणारा कोंबडा झळकणार सिनेमात

सांगलीः पोलीसनामा आॅनलाईन
तुम्हाला वाटेल आता हे काय भलते? बोलका पोपट पाहणे ठीक आहे. पण कोंबडा, कसं शक्य आहे? पण हे खरं आहे! सांगलीच्या आळसंद गावच्या आण्णांचा कोंबडा आता थेट चित्रपटात झळकणार आहे. कोंबड्याच्या मालकाला कर्नाटकातील एका दिग्दर्शकाने तशी आॅफर सुद्धा दिली आहे. बीडमधील काही लोक या कोंबड्यावर लघुपटही बनवणार आहेत. कर्नाटकातील दिग्दर्शकाने कोंबड्याच्या मालकाची भेट घेतली असून, मालकाने या चित्रपटाची आॅफर स्वीकारल्याचे समजते.

समाज माध्यमावर मागील काही दिवसापूर्वी या कोंबड्याचा आण्णा, आण्णा म्हणत असल्याचा व्हिडीअो व्हायरल झाला. बघता बघता हा कोंबडा रातोरात सुपर सीता झाला. मग काय या कोंबड्याला पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करु लागले.

त्याचे झाले असे की, एक दिवस या कोंबड्याची विक्री होणार होती. त्यासाठी त्याला पकडण्यात आले मात्र हातात धरल्यानंतर हा ”अण्णा अण्णा” असे म्हणू लागला त्यामुळे विक्रीचा बेत अचानक रद्द झाला. हा कोंबडा चित्रपटात कसे काम करतोय हे पाहण्याची सर्व गावाला उत्सुकता आहे.