सांगली : भाजपकडून महापौर-उपमहापौर पदांसाठी शिक्कामोर्तब

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन

महापालिकेत प्रथमच सत्तांतर होऊन भाजप सत्ताधारी पक्ष बनला आहे. त्यामुळे सांगली – कुपवाड – मिरज महापालिकेत भाजपचा महापौर मिळणार आहे. आज भाजपच्या पहिल्या महापाैर म्हणून संगिती खाेत तर उपमहापाेर धीरज सुर्यवंशी यांची निवड केली जाणार आहे. काेअर समितीशी केलेल्या चर्चेनंतर पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी या दाेन नावावर शिक्कामाेर्तब केले आहे. भाजकडून सविता मदने व पांडुरंग काेर यांनीही अर्ज दाखल केले आहेत.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1654a664-a172-11e8-b092-398dcd378c8a’]

काॅंग्रेस-राष्ट्रवादीनेही ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला त्यांनी वर्षा निंबाळकर व स्वाती पारधी यांना अनुक्रमे महापाैर, उपमहापाैर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. सभागृह नेतेपदी भाजपचे युवराज बावडेकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपतर्फे पहिली संधी कोणाला याबाबत कुतूहल होते. महिला ओबीसी प्रवर्गातील एकूण आठ जणी इच्छुक होत्या. त्यात मदने, खोत यांच्यासह अनारकली कुरणे, उर्मिला बेलवलकर यांच्या नावाची चर्चा होती. स्थानिक भाजप नेत्याच्या कोअर समितीमध्ये याबाबत चर्चा झाली होती. या समितीने अंतिम निर्णय पालकमंत्र्यांकडे सोपवला होता. काल आमराई क्‍लबमध्ये झालेल्या बैठकीत यावर चर्चा होऊन आज महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा निर्णय झाला. आज चौघांनी अर्ज दाखल केले असले तरी खोत आणि सूर्यवंशी यांची निवड निश्‍चित मानली जात आहे. दरम्यान भाजपच्या गटनेतेपदी अनुभवी तसेच माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांची निवड झाली आहे.