सांगली : गुंड खून प्रकरणातील आणखी तीघे ताब्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

गुंड गणेश बसाप्पा माळगे (वय 28) याच्या खूनप्रकरणातील आणखी तीघांना पोलिसांनी अटक केली. धनंजय संजय गवळी (22), सचिन उर्फ संतोष संजय गवळी (20, दोघे रा. हनुमाननगर) आणि पंकज चन्नापा वाघमारे (21, रामकृष्ण परमहंस सोसायटी) अशी त्या तीघांची नावे आहेत. यापूर्वी माजी नगरसेवक राजू लक्ष्मण गवळी याला अटक करण्यात आली होती.
[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’18633037-a6f2-11e8-a58c-e5931a895dc7′]

अधिक माहिती अशी, की धनंजय गवळी याची डी-मोरया गॅंग आहे. तो या गॅंगचा म्होरक्‍या आहे. काही दिवसांपूर्वी गणेश माळगे आणि धनंजय यांच्यात वाद झाला होता. हा वाद तसाच धुमसत राहिला होता. गणेशची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली होती. हे धनंजयला माहीत असल्याने त्याचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. आपल्या गॅंगची दहशत माजवणे आणि वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांनी हा कट रचला. घरी बोलवून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. घटनेनंतर तातडीने राजू गवळी याला ताब्यात घेतले. आज सकाळी अन्य तिघांना ताब्यात घेण्यात आले.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1fa825f6-a6f2-11e8-8b26-7fe52e164964′]

निरीक्षक अनिल तनपुरे तपास करत आहेत. कारवाईत सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्यासह पथकाचा सहभाग होता.