सांगली : सुगंधित तंबाखू, सुपारीची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

अवैध रित्या सुगंधीत तंबाखू आणि सुपारीची वाहतूक करणाऱ्या दोघांना कारसह अटक करण्यात आली असून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.१३) रात्री मिरज-पंढरपूर रस्त्यावर तासगाव फाटा येथे केली. जप्त मुद्देमालासह दोघांना अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B01DU5OJCQ,B0733BHHS9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’85f2337d-b805-11e8-bb59-5180f6ab6a50′]

मिनाज जुबेर म्हेतर (वय २३), इरशाद बशीर पठाण (वय ३३, दोघेही रा. मोमीन मोहल्ला, तासगाव) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गस्त घालण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार शाखेचे एक पथक कुपवाड, मिरज परिसरात गस्त घालत होते. पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना सुभाषनगरहून तासगावकडे एका कारमधून सुगंधित तंबाखू, सुपारीची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.
[amazon_link asins=’B01BMDTSJ2,B01LY2TN7G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9504d8a9-b805-11e8-8faa-0d2dc057822d’]

त्यानुसार पथकाने मिरज-पंढरपूर  रस्त्यावरील तासगाव फाटा येथे कार  (एमएच १२ एझेड १३८४) थांबवून कारमधील दोघांकडे चौकशी केली. यावेळी मिनाज म्हेतर व इरशाद पठाण यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय आल्याने  कारची झडती घेतल्यावर मागील सीटवर एका ब्लँकेटमध्ये सुगंधित तंबाखू आणि सुपारी आढळून आली. पोलिसांनी तंबाखू आणि सुपारी जप्त करून कारसह दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दीड लाखांची सुगंधित तंबाखू, सुपारी व कार असा साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  जप्त मुद्देमालासह दोघांना अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, अमित परिट, शशिकांत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.