सांगली : पलूस तालुक्यात रखवालदाराचा दगडाने ठेचून खून

पलूस : पोलीसनामा ऑनलाईन

सांडगेवाडी (ता. पलूस) येथील बस थांब्याजवळ भंगाराच्या दुकानातील रखवालदार विठ्ठल जगन्नाथ शिंदे (वय ५०, रा पलूस) यांचा भंगार दुकानातच अज्ञात हल्लखोरांनी दगडाने ठेचून खून केला. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f394533-a7be-11e8-add5-917aff5140c8′]

सांडगेवाडी येथील बस थांब्याजवळील हौसाई लॉजजवळ जहांगीर मुजावर (रा. तासगाव) यांचे भंगार साहित्याचे दुकान आहे. या दुकानात शिंदे गेल्या दोन वर्षापासून रखवालदार म्हणून काम करत होते. शुक्रवारी सकाळी परिसरातील नागरिकांना दुकानासमोर शिंदे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांचे पथक दाखल घटनास्थळी दाखल झाले. डोक्यात सिमेंटचा दगड घालून शिंदे यांचा खून केल्याचे पथकास आढळून आले.

पोलिसांनी भंगार दुकानाचे मालक जहांगीर मुजावर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. शिंदे गेल्या दोन वर्षापासून मुजावर यांच्या भंगार दुकान रखवालदार म्हणून काम करत होते. गेल्या काही वर्षांपासून ते कुटुंबापासून विभक्त राहात होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी शेजारील दुकाने व हॉटेलमध्ये चौकशी केली. तपासासाठी श्वानपथकाची मदत घेण्यात आली. श्वानाने घटनास्थळापासून महामार्गावरुन तीनशे मीटरपर्यंत माग दाखवला.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’94556832-a7be-11e8-bae2-e12f664312de’]

खुनाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत त्यांची पत्नी रुक्मिणी विठ्ठल शिंदे (रा. पलूस) यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील तपास करीत आहेत.