‘भाईजान’ सलमान संगीता बिजलानीसोबत करणार होता लग्न, छापल्या होत्या लग्न पत्रिका ! सत्य कळताच अभिनेत्रीनं ऐनवेळी दिला होता नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आणि एके काळची मिस इंडिया संगीता बिजलानी हिनं नुकताच (9 जुलै 2020) तिचा 60 वा वाढदिवस साजरा केला आहे. आजही संगीता खूपच फिट आणि सुंदर दिसत आहे. संगीताचा जन्म 9 जुलै 1960 रोजी मुंबईत झाला होता.आज आपण संगीताची लव लाईफ आणि लग्नाबद्दल जाणून घेणार आहोत. एक काळ असा होता जेव्हा संगीता सलमान खानसोबतच्या अफेअरमुळं खूप चर्चेत आली होती. दोघं लग्न करणार होते. लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या पंरतु अचानकच असं काही झालं की, संगीतानं या लग्नाला नकार दिला. यानंतर संगीतानं कोणासोबत लग्न केलं हेही आपण जाणून घेणार आहोत.

सलमाननं स्वत:च निवडली होती लग्नाची तारीख
एका रिपोर्टनुसार संगीता आणि सलमान एकमेकांच्या प्रेमात पागल झाले होते. 27 मे 1994 रोजी त्यांचं लग्न होणार होतं. संगीताच्या मते सलमाननं स्वत:च ही तारीख निवडली होती.

10 डेट केल्यांतर ‘सलमान-संगीता’ करणार लग्न
संगीता आणि सलमान यांनी 1986 साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. त्यावेळी संगीता सिनेमात नव्हती आली. रिपोर्टनुसार, दोघंही जवळपास 10 वर्षे नात्यात होते. त्यांचं हे नातं प्रेमापर्यंतही पोहोचलं होतं. दोघांच्या लग्नाचे कार्ड देखील छापल्याचं बोललं जात होतं. करण जोहरच्या चॅट शोमध्ये एकदा सलमाननंच हा खुलासा केला होता की, संगीता बिजलानीसोबत लग्न ठरलं होतं. लग्न पत्रिका देखील छापल्या होत्या. परंतु संगीतानं स्वत:च या लग्नला नकार दिला होता.

सलमानच्या फसवणुकीमुळं दिला होता लग्नाला नकार
खरंतर संगीता बिजलानीनंच या लग्नाला ऐन वेळी नकार दिला होता. 10 वर्षाच्या नात्यात सलमान खाननं धोका दिल्यानं संगीतानं असं केलं होतं. अशाही बातम्या आल्या होत्या की, सलमान खान आणि अ‍ॅक्ट्रेस सोमी अली यांच्या जवळीकता वाढत होती. सलमान आणि सोमी अली यांच्यातील वाढत्या जवळीकतेमुळंच संगीतानं लग्न मोडण्यााचा निर्णय घेतला होता.

सलमानसोबत नातं संपल्यानंतर संगीतानं केलं क्रिकेटरसोबत लग्न
सलमान खानसोबत नातं संपवल्यानंतर संगीता बिजलानीनं 1996 साली क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन सोबत लग्न केलं होतं. अजहरुद्दीन आधीच विवाहित होता. पहिल्या पत्नीला तलाक दिल्यानंतर त्यानं संगीतासोबत लग्न केलं होतं. अजहरुद्दीन सोबत लग्न केल्यानंत संगीतानं इस्लाम धर्म स्विकारला होता. यानंतर तिचं नाव आयशा झालं होतं. परंतु हे लग्न जास्त दिवस काही टिकलं नाही. 2010 मध्ये दोघांचा तलाक झाला.