सांगलीत दुचाकी चोरणारी करणारा चोरटा जेरबंद

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली शहरामध्ये दुचाकींची चोरी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून दुचाकी चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.२१) विश्रामबागमधील शंभर फुटी रस्ता परिसरात करण्यात आली.

संतोष ऊर्फ माया ऊर्फ ऊर्फ बाळू दिलीप कुरणे (वय 22, रा. पाकिजा मस्जिदमागे, सांगली) असे चोरट्याचे नाव आहे.

विश्रामबागमधील शंभर फुटी रस्ता परिसरात गस्त घालत असताना संतोष कुरणे मोटारसायकलवरून संशयास्पदरित्या फिरत होता. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केल्यानंतर शंभर फुटी रस्त्यावरील एका हॉटेलसमोर मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित परीट, अझर पिरजादे, शशिकांत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.