Sangli ACB Trap | 1.5 लाखाची लाच स्वीकारताना महसुल विभागातील 2 मोठे मासे अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

0
558
Sangli ACB Trap | 2 big person of revenue department in anti-corruption net while accepting bribe of 1.5 lakhs
file photo

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – महारवतनाची जमीन विक्री करण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी (Sangli Collector) कार्यालयातील महसूल विभागातील (Revenue Department) अव्वल कारकून आणि लिपीकाला दीड लाख रुपये लाच घेताना (Accepting Bribe) सांगली एसीबीच्या पथकाने (Sangli ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. अव्वल कारकून अनंता विठ्ठलराव भानुसे Ananta Vitthalrao Bhanuse (वय-51 रा. क्रांती नगर, सांगली), रोजगार हमी योजनेचा लिपीक आणि डाटा इंट्री ऑपरेटर दिलीप निवृत्ती देसाई (Dilip Nivritti Desai) अशी लाच स्वीकारणाऱ्या दोघांची नावे आहेत. सांगली एसीबीने (Sangli ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.30) जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पोउपहार गृहाच्या आवारात केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

 

याबाबत तक्रारदार यांनी 19 जानेवारी रोजी सांगली एसीबीकडे (Sangli ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार हे खरेदी करणार असलेल्या जमीनीच्या मालकांनी महारवतनाची जमीन (Mahar Watan Land) विक्री करण्याची परवानगी मिळावी यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्य़ालयात अर्ज केला होता. वरिष्ठांना सांगून अर्ज मंजूर करुन देण्यासाठी स्वत:करीता व वरिष्ठांकरीता अनंता भानुसे यांनी दोन लाखाची लाच (Demanding a Bribe) मागितली. तडजोडी अंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सांगली एसीबीकडे तक्रार केली.

सांगली एसीबीच्या युनिटने 19, 20, 25 आणि 30 जानेवारी रोजी पडताळणी केली असता अनंता भानुसे
यांनी महारवतनाची जमिन विक्री करण्याची परवानगी मिळणेबाबतचा अर्ज वरीष्ठांना सांगुन मंजुर करुन देण्यासाठी
स्वतःकरीता व वरिष्ठांकरीता दोन लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती दीड लाख रुपये मागणी करुन
स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पोपहार गृहाच्या आवारात सापळा रचला.
तक्ररादार यांच्याकडून दीड लाख रुपये लाचेची रक्कम घेताना भानुसे यांना रंगेहात पकडले.
तर दिलीप देसाई यांनी भानुसे यांना लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याने ताब्यात घेण्यात आले. दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली एसीबी पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे (DySP Sardar Nale),
पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी (Police Inspector Dattatraya Pujari), पोलीस निरीक्षक विनायक भिलारे (Police Inspector Vinayak Bhilare),
पोलीस अंमलदार धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अजित पाटील, सीमा माने, चालक अनिस वंटमुरे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Sangli ACB Trap | 2 big person of revenue department in anti-corruption net while accepting bribe of 1.5 lakhs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kasba Bypoll Elections | भाजपतर्फे कसब्यातून शैलेश टिळक यांचे नाव आघाडीवर

Pune Pimpri Crime News | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या तीन कारवाईमध्ये 7 पिस्टल व 9 जिवंत काडतुसे जप्त

Sanjay Shirsat On Sanjay Raut | ‘आजच्या घडीला संजय राऊत राजकारणातील जोकर’ – शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट